उलगुलान संघटनेच्या वतीने येत्या २८आँक्टाेबरला मूल मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

0
210

उलगुलान संघटनेच्या वतीने येत्या २८आँक्टाेबरला मूल मध्ये
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

-किरण घाटे
चंद्रपूर :-कोविड-19 महामारीच्या काळात असंख्य कोरोना योद्धा आपल्या प्राणाची पर्वा न करता या महासंकटाशी सामना करत आहेत. भारतातील प्रत्येक नागरिक स्वतःसोबत इतरांची सुद्धा काळजी करीत आहेत. या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासू शकते. उलगुलान संघटना मूलने देशहिताची व जनहिताची भावना डाेळ्यांसमाेर ठेवूनआपली एक जबाबदारी समजून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे रक्तदान करणे हे महान कार्य असुन या भव्य रक्तदान शिबिरात आपला सहभाग नाेंदवावा असे आवाहन आयाेजकांने एका पत्रकातुन केले आहे.         दरम्यान उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, सुजित खोब्रागडे, तथा रोहित शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपराेक्त रक्तदान शिबिराचे आयोजन दि. २८आँक्टाेबरला मूल नगरीत करण्यांत आले असल्याचे आयाेजक राजू झाेडे यांनी आज या प्रतिनिधीला सांगितले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here