ग्रामपंचायत चापलवाड्याच्या अरेरावी करणां-या ग्रामसेवकास निलंबित करा !

0
452

ग्रामपंचायत चापलवाड्याच्या अरेरावी करणां-या ग्रामसेवकास निलंबित करा !

आमदार डॉ. देवराव होळींना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे निवेदन

चामोर्शी – सुखसागर झाडे:- चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत चापलवाडा येथील ग्रामसेवक पि.एस.मसराम ग्रामपंचायत कार्यालय चापलवाडा येथे कार्यरत होते.दिनांक 31/3/2021 पासून वैद्यकिय रजेवर गेले त्यानंतर पि. ए ,.मुलकलवार ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत चापल वाडा येथील कार्यभार सोपवण्यात आला .
दिनांक 1/6/2021 रोजी पासून ग्रामसेवक पि,एस मसराम ग्रामपंचायत चापलवाडा येथे येत आहेत व या रुजू होणे बाबत येथील सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत तुम्ही कलेक्टर कडे जा ! सी ई ओ कडे जा! आमदार कडे जा!मला कोणाची भीती नाही ! कोणाच्या आदेशाची मला आवश्यकता नाही असे बोलून आयएएस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा अपमान केला आहे . सबंधित ग्रामसेवक मसराम यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय येथे काम करतांना नेहमी गैरहजर राहणे ,मासिक सभा विहित कालावधीत न घेणे , शासकीय योजनांची अंमलबजावणी न करणे याविषयी वारंवार तक्रार करूनही अजूनपर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आली नाही . सदरहु ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालय चापलवाडा येथून तत्काळ हकालपट्टी करून निलंबित करण्यात यावे.अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी रेखा ताई कोहपरे सरपंच ग्रा, प, चापल वाडा ,मनोज येलमुले उपसरपंच चापलवाडा चेक नारायण भट्टलवार ग्रा,सदस्य यशवंत बर्लावार ग्रा,सदस्य ज्योती रामटेके ग्रा,सदस्य , गितेश कोहपरे , गंगाधर रामटेके यांनी केली .
यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , साईनाथ भाऊ बुरांडे ,प्रतीक राठी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here