आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन

0
437

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन

 

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षणविभागाचे शहर प्रमूख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख आणि इमरान शेख यांच्या वतीने छोटा बाजार चौकात लाडू तूला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्यानी जोरगेवार यांची प्रामूख्यतेने उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छोटा बाजार चौकात लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचा लाडू तुला करण्यात आला. या प्रसंगी सदर लाडूचे सामान्य नागरकांना वाटप करुन आमदार किशोर जोरगेवार यांना वाढदिवाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, संगीता शिवणकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here