आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विकासकामांचे भुमिपूजन

0
358

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विकासकामांचे भुमिपूजन

 

 

आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नगीनाबाग आणि बाबुपेठ येथील 60 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. सदर निधीतून नगिनाबाग येथील स्वावलंबी नगर येथील चार सिमंेट काॅंक्रिट रस्ते तर बाबुपेठ येथे श्री. संताजी जगनाडे महाराज तैलीक समाज मंडळ यांच्या खुल्या जागेवर ग्रीन रुम, शौचालय आणि शेडचे बांधकाम केल्या जाणार आहे.
या भुमिपूजन सोहळ्याला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमुख सलिम शेख, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, अल्पसंख्याक विभागाचे युथ प्रमुख राशेद हुसेन, विश्वजीत शाहा, हेरमन जोसेफ, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, प्रा. श्याम हेडाऊ, राहुल मोहुर्ले, रुपेश कुंदोजवार, सायली येरणे, आशा देशमुख, शमा काजी, कौसर खान, अल्का मेश्राम, निलिमा वनकर पांडुरंग गावतुरे, शौकत हुसेन, शकील, बाबा सातपुते, राजेश्वर रायपूरे आदिंची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून शहरातील अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. शहरातील प्रमुख मार्गांच्या विकासासाठी त्यांनी 20 कोटी रुपयांचा निधी खेचून आनला आहे. या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. दरम्यान स्वावलंबी नगर येथील रस्त्यांची अतिषय दुर्दशा झाली होती. सदर मार्ग तयार करण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. तसेच बाबुपेठ येथील श्री. संताजी जगनाडे महाराज तैलीक समाज मंडळ यांच्या खुल्या जागेवर ग्रीन रुम, शौचालय आणि शेडचे बांधकाम करण्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. याची दखल घेत सदर विकासकामांसाठी स्थानिक आमदार निधीतुन 20 लक्ष तर खनिज विकास निधीतुन 40 लक्ष असे एकंदरीत 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज रविवारी या सर्व कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. नागरिकांची जुनी मागणी पूर्ण केल्या बद्दल स्थानिक नागरिकांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. शहरातील अनेक भागात विकास कामे सुरु आहे. पावसामुळे या कामांची गती थोडी मंदावली असली तरी हे सर्व कामे वेळेत पुर्ण होतील असे नियोजन आम्ही केले आहे. महत्वांच्या कामाला आम्ही प्राधान्य देत असुन शहरातील शेवटच्या भागात विकास पोहचला पाहिजे हा आमचा मानस असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या भुमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here