तीन दिवसीय महिला उत्सवाचे थाटात उद्घाटन

109

तीन दिवसीय महिला उत्सवाचे थाटात उद्घाटन

२१६ रुग्णांची आरोग्य तपासणी

नांदा फाटा :- महिला मंडळ नांदाफाटा, शिवस्मारक समिती, नांदाफाटा व तालुका आरोग्य विभाग, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व शिवजयंतीचे औचित्य साधून ‘महिला उत्सव – २०२३’ चे आयोजन सांस्कृतिक भवन, नांदाफाटा येथे करण्यात आले. नुकतेच गुरुवारी या महोत्सवाचे उद्घाटन सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय करता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता अनिल चिताडे उपस्थित होत्या. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या सहउद्घाटक गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, प्रमुख वक्त्या म्हणून राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदा अविनाश जेनेकर उपस्थित होत्या.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्वप्नील टेंभे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, प्राचार्य अनिल मुसळे, आदर्श हिंदी विद्यालय गडचांदूरच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मत्ते, डॉ. बाळासाहेब चौधरी, स्मार्ट ग्राम बिबी येथील सरपंच माधुरी टेकाम, तळोधी येथील सरपंच ज्योती जेनेकर, हिरापुर येथील सरपंच सुनिता तुमराम, भोयगाव येथील सरपंच शालिनी बोंडे, स्वागताध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य आशा संतोष खासरे, प्रिया विनोद नगराळे, सीमा बाळासाहेब चौधरी उपस्थित होत्या.
महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात २१६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, गरोदर मातांसाठी सर्व आवश्यक रक्त तपारणी, दंतरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, कॅन्सर तपासणी, मेंदूरोग तपासणी, मुळव्याध तपासणी, त्वचा रोग तपासणी करण्यात आली.
डाॅ. मनिषा वासाडे, डाॅ. कल्पना गेडाम, डाॅ. वैशाली कतवारे, डाॅ. खुशी गिरडकर, डाॅ. शुभश्री भट्टाचार्य, डाॅ. अकिल कुरेशी, डाॅ. राहुल लांडे, डाॅ. सुशिल चंदनखेडे, डाॅ. रंजन बदरे, अश्विनी राहुलगडे तसेच तालुका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीरकरिता सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश जमदाडे यांनी केले प्रास्ताविक रामकृष्ण रोगे यांनी केले तर आभार पुरुषोत्तम निब्रड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिबिराचे मुख्य संयोजक अभय मुनोत, पुरुषोत्तम निब्रड, रामकृष्ण रोगे, हारूण सिद्दीकी, संजय बुरघाटे, गणेश लोंढे, सतिष जमदाडे, नितेश शेंडे, कल्पतरू कन्नाके, दिपक खेकारे, उदय काकडे, समीर सिद्दीकी यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले.

advt