संगणक व ईतर साहित्य चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
433

संगणक व ईतर साहित्य चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चोरीस गेलेले 2 संगणक व 3 प्रिंटर की 52000 रु.चा मुद्देमाल जप्त

चिमूर पोलिसांची चतुरतेने धडक कारवाई

पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील स्वामी विवेकानंद आयटीआय येथे दि 04/09/2020 ते 05/09/2020 चे रात्रौ दरम्यान आत प्रवेश करून अज्ञात आरोपितांनी संगणक, प्रिंटर व इतर साहित्य की. 52000 रु चा मुद्देमाल चोरी करून नेल्याचे फिर्यादी कुंदन तपासे यांनी रिपोर्ट दिली असता पोलीस स्टेशन चिमूर येथील ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी चिमूर भागात आपली गोपनीय यंत्रणा राबवून चिमूर येथील आरोपी सौरभ मनोहर चांदेकर वय 20 वर्ष, प्रतीक ताराचंद मत्ते वय 21 वर्ष, स्वप्नील रामकृष्ण बंडे वय 23 वर्ष सर्व रा चिमूर याना ताब्यात घेऊन कसोशीने व चाणाक्ष बुद्धीचा वापर करून सर्वाना विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल 2 संगणक व 3 प्रिंटर की 52000 रु चा जप्त करण्यात आला. सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनात पोनी स्वप्नील धुळे, पोहवा विलास निमगडे , सचिन खामनकर, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सतीश झिलपे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here