देवाडा येथे सरपंच व उपसरपंच पदी भाजपा चा झेंडा

0
376

देवाडा येथे सरपंच व उपसरपंच पदी भाजपा चा झेंडा

थेट सरपंच पदाकरीता शंकर मडावी व उपसरपंच पदी सौ. सत्त्यावा बोंकुर यांची बहुमताने उपसरपंच पदी निवड

भाजपा राजुरा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे व भाजपा शिष्टमंडळाने नवनियुक्त उपसरपंच बोंकुर यांचे अभिनंदन केले

राजुरा, ११ जाने. : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये ग्रामपंचायत देवाडा इथे थेट सरपंच पदाकरीता शंकर मडावी निवडून आले होते. त्याच ग्रामपंचायतीवर आज दि ११ जाणेवारी रोजी उपसरपंच पदाकरीता निवडणूक ठरवली होती त्याच प्रक्रियेमध्ये भाजपाच्या सौ सत्त्यवा बोंकुर या स्पष्ट बहुमताने विजयी झाल्या. देवाडा ग्रामपंचायत ही गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती एवढेच नाही तर ज्यांच्या नेतृत्वात काँग्रेस ग्रामपंचायत देवाडा निवडणूक लढवली ते राजुरा पंचायत समितीचे सभापती होते. आज देवाडा येथील जनतेने काँग्रेस ला वगळून ग्रामपंचायतीची संपूर्णतः सत्ता ही भजपमय केली आहे.

त्याच अनुषंगाने आज माजी जी. प. सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे यांनी भाजपा शिष्टमंडळासोबत नवनिर्वाचित उपसरपंच सौ सत्त्यावा बोंकुर यांचे अभिनंदन केले व गाव विकासासाठी भाजपा नेहमी आपल्या ग्रामपंचायतीच्या पाठीशी ठामपणे उभी असणार असे आश्वस्त केले.

त्याप्रसंगी माजी जी. प. सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, देवडा ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच शंकर मडावी, भाजपा नेते तथा उपसरपंच नोकारी,वामन तूरानकर, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास आघाडीचे राज्य सह संयोजक प्रदीप बोबडे, भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा राहुल सूर्यवंशी, ग्राम पंचायत सदस्य बेबीताई मडावी, शंकर मेश्राम,रत्तुबई मडावी, माजी सरपंच लक्ष्मी पंदरे, राजकुमार मेकालवर, किरण चेंमेनवार, श्रीनिवास मंथंवार, शंकर दडगेलावर, पोच्चाया चेल्लावर, सुभाष तेलिवर, व्यंकटेश चेंमेंवार, सुमा आफ्रिन व बहुसंख्येने देवाडा येथील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here