सुडाच्या भावनेतून नगराध्यक्षांच्या अपात्रतेची कारवाई

0
491

सुडाच्या भावनेतून नगराध्यक्षांच्या अपात्रतेची कारवाई

आमदार डॉ. देवराव होळी यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

जनतेमध्ये भाजपाविषयी अविश्वासाची भावना निर्माण करण्यासाठीच भाजपा नगराध्यक्षांवर उगवला सूड

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोलीच्या नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे या भाजपाच्या असल्याने महाविकास आघाडी सरकारने सुडाच्या भावनेतून त्यांना अपात्र केले असून जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना अशाप्रकारे शासन स्तरावरून अपात्र करणे हे अन्यायकारक आहे. जनतेच्या मताचा अनादर करित त्यांना अपात्र केले.
ही लोकशाहीची क्रूर थट्टा असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे.

२०१५-१६ च्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढविली त्या वेळी भाजपाचे २५ पैकी २१ नगरसेवक निवडून आले व संपूर्ण शहरातून झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ योगिताताई पिपरे या प्रचंड बहुमताने निवडून आल्या.
मागील ५ वर्षाच्या कालावधीत गडचिरोली शहरामध्ये कधी नव्हे एवढी विकासाची कामे झाल्याने विरोधकांच्या पोटामध्ये दुखू लागले व भविष्यातही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच बसेल या भीतीने विरोधकांनी काही असंतुष्ट नगरसेवकांना हाताशी धरून नगराध्यक्ष यांच्याविरोधात पदाचा गैरवापर करून वाहन भत्ता उचलल्याचा खोटा आरोप करित तक्रार दाखल केली. परंतू राज्य सरकारच्या जीआर प्रमाणे नगर परिषदेने नगराध्यक्षांना वाहन भत्ता देय राहील याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर केलेला होता. त्यामुळे शासन निर्णय व नगर परिषदेच्या नियमाप्रमाणे मुख्याधिकारी यांनी वाहन प्रवास भत्ता देय केला. मात्र काही असंतुष्ट नगरसेवकांनी त्या विरोधात तक्रार देऊन त्यांना अपात्र करावे अशी सातत्याने मागणी केली. वास्तविक पाहता नगरपरिषदेच्या ठरावानुसार त्यांनी वाहन भत्ता उचललेला होता परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आपल्याला या भाजपाच्या नगराध्यक्षाला अपात्र करण्यात सहज यश मिळवता येईल. अशी महत्त्वाकांक्षा बाळगून काही बंडखोर असंतुष्ट नगरसेवकांनी राज्य सरकारला हाताशी घेऊन नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठी सातत्याने तगादा लावला.
याबाबत न्यायालयाने राज्य सरकारने सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. मात्र कोणतीही सुनावणी न घेता अखेर जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला अपात्र करण्यात आले. ही लोकशाही क्रूर थट्टा असून केवळ भाजपाचे नगराध्यक्ष असल्याने त्यांना अशा अन्यायकारक पद्धतीने अपात्र करण्यात आल्याचा आरोप आमदार डॉ देवराव जी होळी यांनी केला. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात लवकरच न्यायालयात दाद मागण्यात येईल व त्यातून आम्हाला न्याय मिळेल.असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here