कांग्रेस आणी भाजपाच्या वादात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले, ईमारत झाली शोभेची वास्तू 

0
285
कांग्रेस आणी भाजपाच्या वादात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले, ईमारत झाली शोभेची वास्तू 
 घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारावर आहे व घुग्घुस लगत नायगाव, शेनगाव,बेलसनी, म्हातारदेवी,मुरसा, उसगाव,पांढरकवडा इत्यादी गावातील नागरिक यांची लोकसंख्या जवळपास इतकीच या सर्व नागरिकांचा आरोग्याच्या भार एकट्या घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांकडून सतत नवीन मोठा दवाखाना च्या मागणीवर कांग्रेसचे पालकमंत्री असताना मंजुरी देण्यात आली भूमिपूजन करून  बांधकाम सूरू झाले त्यानंतर २ वर्षांनी भाजपाचे पालकमंत्री जिल्ह्याला लाभले पण ३ ते ४ वर्ष ओलांडून सुद्धा अजूनही बांधकाम अपूर्णचं आहे या घटनेची दखल घेत दवाखान्याचा बांधकाम करीत असलेल्या कंत्राटदाराला आम आदमी पार्टी कडून संपर्क केले असता असे कळाले की त्या कंत्राटदाराचा अजूनही बांधकामाची रक्कम सरकार कडून देण्यात आलेली नाही साधारणतः ४ ते ५ कोटी रक्कम थकबाकी आहे म्हणून बांधकाम थांबून असल्याचे समजले, या सर्व बाबीत मात्र नागरिकांची कोंडी होत आहे जनसामान्यांना औषधोपचारापासून वंचित राहावे लागत आहे कारण एकच इतका भार सध्याचे प्राथमिक केंद्राच्या मर्यादेबाहेर आहे यावर आम आदमी पार्टी सध्याचे पालकमंत्री आणि शासन,प्रशासनेला निवेदन करते की तात्काळ या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करून हा नवीन दवाखाना जनसेवेसाठी सुरू करावा अन्यथा आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल.
आम आदमी पार्टी पक्षाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जाऊन सरकारी रुग्णालयाची पाहणी केली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे, संतोष सलाने, करण बिऱ्हाडे,संतोष भारती, अनुप नाले, युवा अध्यक्ष सचिन शिरसागर, महिला अध्यक्ष उमा तोकलवार ,हसीना शेख, रीना परपुल्ला सोबत अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here