ग्रामीण रुग्णालयासाठी घुग्घुस काँग्रेसचे आंदोलन म्हणजे “वराती मागून घोडे”

0
293

ग्रामीण रुग्णालयासाठी घुग्घुस काँग्रेसचे आंदोलन म्हणजे “वराती मागून घोडे”

निधी लवकरच मिळणार असल्याने आंदोलनाचे नाटक

घुग्घुस येथील काँग्रेसने ग्रामीण रुग्णालयासाठी केलेले आंदोलन म्हणजे “वराती मागून घोडे” असे टीकास्त्र भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सोडले आहे.

घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाची अर्थसंकल्पीय प्रशासकीय मंजुरी ही भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी हे रुग्णालय आम्ही मंजुर केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. भाजपाने केलेल्या विकासकामांचे श्रेय काँग्रेसच्या नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली आहे.

माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी घुग्घुस येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडे प्रयत्न करून मंजुरी मिळविली होती.

त्यानंतर हे रुग्णालय मंजूर झाले. भाजपाच्या कार्यकाळात या रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु असतांना २०१९ मध्ये राज्यात जनतेशी विश्वासघात करून सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून निविदा प्रक्रिया बंद केली.

नंतर दोन वर्षानंतर ती निविदा प्रक्रिया पुन्हा सुरु केल्याचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले भाजपा सरकारच्या काळातील विकासकामांवर श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार काँग्रेसने बंद करावा. ग्रामीण रुग्णालयासाठी तत्काळ निधी उपलब्ध होणार आहे शासन स्तरावर कारवाई पुर्ण झाली आहे आणि लवकरच निधी मिळणार आहे.

अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारची सत्ता असतांना ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण का करू शकले नाही असा प्रश्न भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here