आता घरीच प्राणवायू उपलब्ध होणार…वणीत प्राणवायू निर्मिती सयंत्राचे लोकार्पण सोहळा

0
536

आता घरीच प्राणवायू उपलब्ध होणार…वणीत प्राणवायू निर्मिती सयंत्राचे लोकार्पण सोहळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग वणी व संस्कृती संवर्धक मंडळ यांनी आजच्या परिस्थितीत सामान्य व गरजू लोकांना उपयोगी पडावा या हेतूने प्राणवायू निर्मिती सयंत्राचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी तालुका संघचालक हरिहर भागवत यांचे हस्ते तथा ज्येष्ठ समाजसेवक सुरेश बन्सोड यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव यांनी रा स्व संघाच्या वतीने सुरू असलेल्या अन्य सेवकार्याचीही माहिती उपस्थिताना दिली.
रुग्णांना आवश्यक ती मदत करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती तथा भोजन, दवाखान्यातील खाटांची उपलब्धता, रक्त तथा औषधींचाही मदत, नगरातील सेवावस्तीमंध्ये निर्जंतुकीकरण करणे, लसीकरणाबाबत जनजागृती व उपलब्ध मात्रांबाबत विस्तृत माहिती देणे इत्यादी सर्व उपक्रम वणी परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने राबविण्यात येत आहे. प्राणवायू निर्मिती सयंत्राची तांत्रिक माहिती नगर कार्यवाह डॉ. निलेश चचडा यांनी विषद केली. या सयंत्राद्वारे निसर्गतः हवेतून प्राणवायू तयार केला जातो. या सयंत्रामुळे गरजू बाधितांना घरीच प्राणवायू उपलब्ध होणार आहे.

वैयक्तिक गीत कृष्णा पूरवार यांनी सादर केल्यानंतर प्रमुख अतिथींनी उपक्रमाच्या बाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी किरण बुजोणे, दिपक नवले, अर्जुन उरकुडे, विवेक पांडे, प्रमोद सप्रे, कवडू पिंपळकर, प्रकाश कौरासे, प्रसन्ना संदलवार, जिल्हा प्रचारक स्वप्नील राऊत, प्रज्योत रामगिरवार, अँड. धगडी, मनोज सरमोकदम, केतन लाभे, संजय जिण्णावार यांसह अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here