लोकसभा मतदार संघात प्रतिभा धानोरकर यांचा झंझावाती दौरा 

0
63

लोकसभा मतदार संघात प्रतिभा धानोरकर यांचा झंझावाती दौरा 

चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदार संघात झंझावाती दौरा केला. या दरम्यान झालेल्या सभांला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्व सभांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती.

काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना  उमेदवारी दिली. त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी नामांकन दाखल केले. मतदार संघाच्या कानोकोपऱ्यातून कार्यकर्ते, समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.मागील दोन दिवसात धानोरकर यांनी मतदार संघात झंझावाती दौरा केला. कोरपना, जीवती, गडचांदुर, राजुरा कोठारी, परसोडी कुडेसावली, तोहोगाव, लाठी, बल्लारपूर, गांधी नगर घुग्घुस, दुर्गापूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, केमारा, मूल येथे झालेल्या सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सामान्य नागरिक उपस्थित होते. आमदार सुभाष धोटे, घनश्याम मुलचंदानी, राजू रेड्डी, सचिन कत्याल, तुकाराम झाडे, देविदास सातपुते, अशोक रेचनकर, राजेंद्र वैध, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट), डॉ. अभिलाषा गावतुरे, घनश्याम मुलचंदानी, नम्रता ठेमस्कर, बेबीताई उयके, गोविंदा उपरे, नागेश गांजेलवार, संतोष इटनकर, सुरेश चहारे, बंडू वासाळे, निलकंठ भगत, शैलेश रामटेके, गौतम तोडे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमसकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मलाताई कुडमेथे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अरुण धोटे, हमीदभाई, आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्याताई चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर यांची उपस्थिती होती. सभेमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सहानुभूती आणि अश्रूंना पुढे करून धानोरकर मते मागित आहेत, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. घुग्घुस येथे झालेल्या सभेत  आमदार सुभाष धोटे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर दुःख होणं साहजिकच आहे. कधी आनंदाच्या क्षणात, दुःखात कठीण समयी आठवण होऊन डोळे ओले होणे हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. एखाद्या महिलेच्या भावनांचा, त्यांचा अश्रूंचे तुम्ही राजकारण करता. यातून तुम्हच्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन झाले अश्या शब्दात  धोटे यांनी विरोधकांना सुनावले. धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान धोटे यांनी केले आहे.

आम्ही मोठ मोठ्या इमारती बांधल्या नाहीत. मात्र जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा जनतेसाठी धावून गेलो आहोत. ही हुकूमशाही विरोधात लोकशाहीची लढाई आहे. बाळूभाऊंना तुम्ही साथ दिली. आता मला तुम्हची गरज आहे, असे भावनिक आव्हान धानोरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here