बल्लारपुर पोलिसांनी आवळल्या जनावर तस्करांच्या मुसक्या

0
597

बल्लारपुर पोलिसांनी आवळल्या जनावर तस्करांच्या मुसक्या

मोठी कारवाई36 जनावरांची सुटकाचार आरोपी अटक

22 लक्ष 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपुर : दिनांक 10 जानेवारी 2023 मंगळवार रोजी सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड सोबत पोलिस हवालदार सतीश पाटील, पीएसआय सुनील ढवस व चालक असे डिव्हिजन गस्त करीत असताना सकाळी 4 वाजता पोलीस स्टेशन कोठारी येथे भेट देऊन बल्लारपूर कडे येताना गोपनीय माहिती मिळाली की कोठारी कडून एक जनावरे भरलेले आयचर ट्रक येत आहे.

यावेळी पीएसआय गवारे, नापोशी संतोष, पोहवा रतन पेंदाम यांनी बामणी टी पॉइंट येथे नाकाबंदी लावणेस सांगितली व सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड हे कळमना गाव येथे ट्रॅप लाऊन होते. त्यानंतर काही वेळाने गोपनीय माहिती प्रमाणे एक आयचर टेंपो क्र. एम एच 34 बी जी 8752 भरधाव वेगाने जाताना दिसून आला. यावेळी सदर वाहनाचा पाठलाग करून बामणी टी पॉइंट येथे पकडले.

यावेळी सदर वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाहन चालक सोबत 2 इसम व पाठीमागील बाजूस गाय-18, बैल-5, गोरा-7, कालवड-6 असे एकूण 36 जिवंत जनावरे दिसून आले. ज्याचे पाय बांधून घेऊन जाताना मिळून आले. तसेच एक नग कालवड मरण पावलेल्या स्थितीत मिळून आले.

पायलटींग करिता वापरलेले टीयूवि महिंद्रा कंपनीचे वाहन क्रमांक एच आर 51 बी पी 0340 व त्या मधील एक इसम असे एकूण 4 इसम, 2 वाहन व 37 जनावरे असा एकुण 22,85,000 रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेले जनावरे उज्ज्वल गोरक्षण संस्था लोहारा येथे दाखल करण्यात आले असून त्याबाबत पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे अप क्र. 25/2023 प्राण्यांना क्रूरतेने वागविने अधिनियम 11(A)(B) (D)(E) व 279,429 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, पीएसआय गवारे, पोहवा सतीश पाटील, नपोशी संतोष, पोशी दिलीप अदे, पोशि वाकडे, पोशी राहुल चालक ढवास, पोहवा रतन यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश हत्तिगोटे करत आहेत. सदर आरोपीना दिनांक 13 जानेवारी 2023 पर्यंत पी सी आर देण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपुर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here