भद्रावती येथे महाराष्ट्र व तेलंगाना खुली कराटे उत्साहात

115

भद्रावती येथे महाराष्ट्र व तेलंगाना खुली कराटे स्पर्धा उत्साहात

भद्रावती/प्रतिनिधी – नुकतीच भद्रावती येथे महाराष्ट्र व तेलंगणा खुली कराटे स्पर्धा उत्साहात व थाटात पार पडली. स्पर्धेमध्ये दोन्ही राज्यांतील अनेक कराटे पटुंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

आयोजित स्पर्धेत राजूरा येथील मास्टर प्रकाश पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले.

मुलांमधून प्रथमेश प्रकाश पचारे, ओम चुंबले, चैतन्य रागीट यांना सुवर्ण पदक, तर चैतन्य जेनेकर, पारस पचारे हे कास्य पदकाचे मानकरी ठरले.

मुलींमध्ये तक्षु कडुकर, प्रगती जेनेकर यांना सुवर्णपदक, आराध्या चौधरी हिला रजतपदक, तन्वी सुनिल रामटेके व अनवी बु॒-हाण हे कास्यपदकांचे मानकरी ठरले.

सर्व विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे व आई वडिलांना दिले. दरम्यान विजयी स्पर्धकांचे राजूरा शहरवासीयांनी कौतुक केले आहे.

जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख विनय बोंढे यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या अनेक कराटे पटुंना शुभेच्छा दिल्या.

advt