मनपाने बाबुपेठ उड्डाण पुलाचे 5 कोटी रुपये तत्काळ वळते करावे – आ. किशोर जोरगेवार

0
672

मनपाने बाबुपेठ उड्डाण पुलाचे 5 कोटी रुपये तत्काळ वळते करावे – आ. किशोर जोरगेवार

निर्देश – सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा अधिका-र्याशी बैठक

 

 

बाबुपेठ उड्डाणपुल शहरातील महत्वाचा प्रश्न आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मनपाने द्यायचा असलेला पाच कोटी रुपयांचा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. या अतिमहत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन शहरात सुशोभीकरण आणि सत्ताधारी पदाधिका-र्यांच्या वाहण खरेदी व त्याच्यावरील व्हिआयपी नंबरसाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात आला. यावर संतात व्यक्त करत बाकीची अनावश्यक कामे थांबवुन बाबुपेठ उड्डाणपुलाचे पाच कोटी तात्काळ वळते करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिले आहे.

 

बाबुपेठ उड्डाणपुलाच्या आजस्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाागचे कार्यकारी अभियंता भास्करवार, मनपा आयुक्त राजेश मोहिते, डॉ. सुरेश महाकुलकर यांच्यासह इतर अधिका-र्यांची उपस्थिती होती.

 

 

बाबुपेठ उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्य सरकार कडून 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. आता मनपा प्रशासनानेही त्यांच्याकडे थकीत असलेला 5 कोटी रुपयांचा निधी तात्काळ वळता करावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. आज आयोजित बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ उड्डाणपुलाच्या कामाबाबत मनपाच्या सुरु असलेल्या उदासिन भुमिकेवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षात टप्याटप्याने मनपाने हा पाच कोटी रुपयांचा निधी वळता करणे अपेक्षित होते. मात्र यातील एक रुपयाही मनपाने अद्याप दिलेला नाही. बाबुपेठ वासीयांच्या ईतक्या मोठ्या समस्येकडे मनपा प्रशासनाने चक्क दुर्लेक्ष केले. मात्र आता हा प्रकार खपविल्या जाणार नाही. या शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त केला. राज्‍य शासनाकडून ४०.२६ कोटी रू. रेल्‍वेने वहन विभागाकडून १६.३१ कोटी व चंद्रपूर महानगरपालिकेने ५ कोटी रू. अश्या एकूण ६१.५७ कोटी रुपयातून सदर पुलाचे बांधकाम होणार आहे. यात राज्य शासन व रेल्वे विभागाने आपला वाटा उचललेला आहे.

मात्र मनपा प्रशासनाने त्यांना द्यायचे असलेले ५.०० कोटी रुपये ७ वर्षाचा काळात दिलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी हा निधी थांबवून बाबूपेठकरांचा छळ करण्याचे काम केले आहे. मात्र आता आपण प्रशासक म्हणून काम करत आहात. त्यामुळे आपण बाबूपेठकरांना न्याय देत आपल्या कडे थकीत असलेला ५.०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ बाबूपेठ उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वळता करावा. सदर निर्देश यावेळी मनपा प्रशासकाला दिले आहे. तसेच 61 कोटी रुपये खर्च करुन साकार होणार असलेल्या या पुलाला आता 81 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे या वाढीव निधीचा प्रस्तावही तात्काळ सादर करावा अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिका-र्यांना केल्या आहे. सदर वाढीव निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने माझे प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी या बैठकीत म्हटले असुन युध्द पातळीवर हे काम पुर्ण करुन याच वर्षी या पुलावरुन वाहणे धावेल असे नियोजन करा अशा सुचनाही यावेळी त्यांनी अधिका-र्यांना केल्या आहे. आवश्यक असल्यास मुंबई येथे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करणार असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, विलास वनकर, राम जंगम, रुपेश पांडे, चंद्रशेखर देशमुख, तापोष डे, अॅड. परमहंस यादव, विलास सोमलवार यांच्यासह बाबुपेठ येथील नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here