गोल बाजारातील स्वच्छतालय पाडण्याच्या मनपाच्या निर्णयाविरोधात आयुक्त कक्षासमोर आम आदमी पक्षाचे ठिय्या आंदोलन

0
442

गोल बाजारातील स्वच्छतालय पाडण्याच्या मनपाच्या निर्णयाविरोधात आयुक्त कक्षासमोर आम आदमी पक्षाचे ठिय्या आंदोलन

राहुल पावडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना आर्थिक संगनमत करून दिली शौचालय तोडण्याची परवानगी – ‘आप’ चा आरोप

 

 

गोल बाजार परिसरातील व्यापारी छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी असलेले स्वच्छतालय केवळ एका गर्भश्रीमंत व्यापार्‍याच्या फायद्यासाठी पाडण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या विरोधात आज 30 मे रोजी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या आयुक्त कक्षासमोर निषेध करण्यात आला. त्याची तातडीने दखल घेत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

 

गोल बाजार येथे महानगरपालिका चे सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे व्यापारी, छोटे व्यावसायिक, ग्राहक यांना सोयीचे होते. मात्र ही जागा एका धनाढ्य व्यापाऱ्याला देण्यासाठी रस्ता बांधकामाच्या नावावर स्वच्छतालय पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. शौचालय पाडण्याबाबत व्यापारयाचा विरोध आहे. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या नेतृत्वात आज 30 मे रोजी महानगरपालिकेतील आयुक्त कक्षासमोर ठिय्या आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला. मनपाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांना देखील उघड्यावर यावे लागणार आहे. छोटे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व्यावसायिकांना या निर्णयामुळे स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. आम आदमी पार्टी ने केलेल्या या आंदोलनामुळे स्वच्छतालय पाडण्याचा निर्णय मागे घेण्यात येणार आहे.

 

आयुक्तांच्या चर्चेवेळी आम आदमी पार्टी शिष्टमंडळ तसेच गोल बाजार व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी सोबत होते या की या आंदोलनात महिला अध्यक्ष ऍड सुनीता पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा अध्यक्ष मयूर राईकवार, श्री राजेश चेडगुलवार, श्री.सुनील रत्नाकर भोयर संघटन मंत्री महानगर, श्री सिकंदर सागोरे उपाध्यक्ष , महानगर सचिव राजू कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, अल्पसंख्यक अध्यक्ष अशरफ सय्यद अली, सुनिल सदभैया माजी सैनिक, सुजाता बोडेले संघटन मंत्री, मनीषा पडगेलवार , वन्दना कुंदावार महिला शहर सचिव, शबनम शेख कार्यकारी अध्यक्ष, महेश सिंग , सागर बोबडे, महेंद्र प्रधान देवेंद्र प्रधान, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here