भारतीय जनता पक्षात जिवती तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

0
327

भारतीय जनता पक्षात जिवती तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

जिवती तालुक्यातील पाटण- खडकी (रायपूर) जि.प. क्षेत्रातील खडकी (हिरापुर) तेथे जिवती तालुका भाजप च्या वतीने आयोजीत मेळाव्यात येथील गाव पाटील भिमराव पा.मडावी यांच्या सह कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेतलेला भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असल्याने भाजपात प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अँड संजय धोटे व मुख्य अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर तथा मान्यवरांनी या (दि.०९.०१.०२३) रोजी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पक्षाचे दुपट्टे टाकूनअभिनंदन केले. याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असून, सर्वांगीण विकासाची दुरदृष्टी असणारे नेते या या जिल्ह्यात असल्यामुळे झपाट्याने विकास सुरु झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

या मेळाव्यात माजी सरपंच गाव पाटील श्री.भिमराव पा.मडावी व माजी सरपंच लिलाताई मडावी , मानिक महाराज , पोचीगुडा चे गाव पाटील अर्जुन मडावी, हीरापुर येथील गाव पाटिल जंगु पा. सोयाम, सलमान भाई व भाईपठार येथील श्री सय्यद मदार भाई, सय्यद अल्लाबक्ष, सय्यद अहमद भाई सह कार्यकर्त्यानी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री लोकनेते ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार , राष्ट्रीय ओबिसी आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री श्री. हंसराज भैय्या अहिर , माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यानी भाजपामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी खडकी येथील वयोवृध्द प्रतिष्ठित मारू पाटिल गेडाम यांच्या घरी जाऊन माजी आमदार सुदर्शन निमकर व उपस्थितांनी शाल, श्रीफळ, दुपट्टा देऊन सत्कार केला.

या मेळाव्यास तालुका भाजप अध्यक्ष केशवजी गिरमाजी , महामंत्री सुरेशजी केंन्द्रे , उपसभापती तथा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष महेश देवकते, जिवती तालुक्यातील निवृत्त केंद्रप्रमुख सुधाकरराव चांडनखेडे गुरुजी, पाटण येथील भाजप नेते विठ्ठल चव्हाण, माधव निवळे , बालाजी भुत्ते पाटील, विठ्ठलजी चव्हाण, पुंडलिक वारदे, किशोर चांदुरे, सतोष जाधव अर्मुतवर्षा पिल्लेवाड , शेंवताबाई वेरखेडे , कमलाबाई मडावी, रामकिसन कोडापे , स.मदारभाई, आडे पाटील , श्री माने सह मोठ्यासंखेने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here