राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त उपरवाही येथे रक्तदान शिबिर 

0
410

राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त उपरवाही येथे रक्तदान शिबिर 

गडचांदूर :- स्वराज्य युवा मंडळ व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांचा जयंतीचे अवाचीत्य साधात उपरवाही येथे रक्तदान व रक्तगट, रक्तदाब तपासणी शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमा प्रसंगी गायकवाड प्रोजेक्ट मॅनेजर आर के सी, श्रीकांत कुंभारे प्रोजेक्ट मॅनेजर अंबुजा फाऊंडेशन, गिताताई शिडाम सरपंच उपरवाही, रक्तसंक्रमन अधिकारी पवार, डी बी बोडे, अशोक तलांडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपरवाही, लक्ष्मण बोंडे पोलीस पाटील उपरवाही, व अशोक बोंडे तमुस अध्यक्ष उपरवाही, बेले मुख्याध्यापक जि. प.शाळा उपरवाही, व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी २५ युवकांनी रक्तदान केले तर ५५ नागरिकांनी रक्तगट व रक्तगट तपासणी केली. संचालन सुभाष बुऱ्हान यांनी केले तर आभार गणपत गाडगे यांनी मानले. यावेळी स्वराज्य युवा मंडळाचा पदाधिकारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here