निर्माणाधीन असलेल्या विचोडा येथील गेटेड बंधाऱ्याची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

0
408

निर्माणाधीन असलेल्या विचोडा येथील गेटेड बंधाऱ्याची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जलसंधारन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या १२ करोड रुपयांच्या निधीतून विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला येथे बंधा-र्याचे काम सुरू आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी येथील बंधा-र्याची पहाणी करत अधिकार्यांना आवश्यक सूचना केल्या आहे.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, यंग चांदा ब्रिगेडचे गुड्डू सिंग, मुन्ना जोगी, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाढई, सरिता पिंपळकर, महादेव पाटील पिंपळकर, देविदासपाटील पिंपळकर, भास्कर नागरकर, समीर रामटेके, रोहित झाडे, कर्मवीर वैद्य, विदेश रामटेके, महेश वाढई, राहुल गणफाडे, प्रतीक झाडे, शुभम झाडे आदिंची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मोठा निधी या भागात आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विकासकामांसाठी खर्च केला आहे.
विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला लगत असलेल्या गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सदर तिन्हीही गावात गेटेड बंधारे तयार करण्यात यावेत अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

अखेर या कामासाठी जलसंधारन विभागाने १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. या निधीतून या तिन्हीही गावात बधा-र्यांचे काम सुरु करण्यात आले असुन सदर काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी येथे अचाणक भेट देत येथील निर्माणाधीन असलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधत सदर काम वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना केल्या. कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. बंधार्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बदल यावेळी विचोडा ग्रामपंचायत येथे आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करत गावकर्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी विचोडा ग्रामपंचायत सदस्य बंडू रामटेके, अंकित ढेंगरे, शोभा दिवसे, संगीता बोबडे, यंग चांदा ब्रिगेडचे संजू बोबडे यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here