रेल्वेच्या इंजिनवर आढळला बिबट मृतावस्थेत

0
606

रेल्वेच्या इंजिनवर आढळला बिबट मृतावस्थेत


घुग्घुस येथील रेल्वे सायडिंग जवळच्या उभ्या असलेल्या रेल्वेगाडीच्या इंजिनवर सकाळी धुलिवंदन सणाच्या दिवशी एक बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरातील चांगलीच खळबळ उडाली.

हि बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. हि माहिती पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. पोलीस ठाणेदार आसिफ शेख हे पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. चौकशी करुन वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच रेल्वे इंजिनवर मृतावस्थेत असलेला बिबट ताब्यात घेवून रवाना झाले. सिटीपीस पाॅवर स्टेशन येथुन इंजिन वर उडी मारत असताना हाईटेंशन इलेक्ट्रिकचा करंट लागून मृत्यु झाला असावा अशी नागरिकात चर्चा आहे. या घटनेचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here