फैजल खान, आदित्य निकारी यांची राज्यस्तरीय कबड्डी साठी निवड

0
482

फैजल खान, आदित्य निकारी यांची राज्यस्तरीय कबड्डी साठी निवड

नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाची राज्यस्तरावर भरारी

 

 

नांदाफाटा, नितेश शेंडे : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘चौथी खेलो इंडिया युथ गेम 2021-2022’ अंतर्गत पार पडलेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी या खेळातील निवड चाचणीमध्ये नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाचे वर्ग बारावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी फैजल खान समीर खान पठाण व आदित्य सुनील निखारे हे विभागीय स्पर्धेकरिता पात्र ठरले होते. त्याअन्वये नागपूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केले व यश संपादन करीत राज्य स्तरावर मान मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा लावण्याचे काम केले. दिनांक 14 डिसेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये विभागीय संघात या दोन्ही विद्यार्थ्यांचा समावेश झालेला असून ते नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरुकुल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सद्गुरु जगन्नाथ बाबा शिक्षण महाविद्यालय संत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळात चे समस्त पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक-पालक संघ व डॉ.अनिल मुसळे,प्राध्यापक प्रकाश लालसरे, विकास दुर्योधन रत्नाकर बोभाटे, प्रमोद वाघाडे,संदीप खिरटकर, रामकृष्ण रोगे व समस्त शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here