आगामी ग्रापं, पंस, जिप निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती

0
1136

आगामी ग्रापं, पंस, जिप निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती

 

राजुरा, 16 सप्टें. : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका राजुरा, जीवती व कोरपना तालुक्यात वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना तंत्र पार्टी एकत्र युतीने लढणार आहेत. त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, गोंडवाना तंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव रघु मेश्राम यांच्या उपस्थितीत युती निश्चित करण्यात आली.

राजुरा, जिवती, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात झालेली वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या युतीने प्रस्थापित सत्ताधारी पक्षांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. सत्ताधारी पक्षांना कंटाळलेल्या नागरिकांना आता भक्कम पर्याय म्हणून हि युती समोर आली आहे. यामुळे सत्ताधारी पक्षांना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत मोठ्या अडचणीला सामोरे जाण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

वंचित, शोषित, तळागळातील सामान्य जनतेला सत्तेत बसविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि सामन्यांना सत्तेत बसवेल. वंचित बहुजन घटक केंद्रस्थानी ठेवून वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित पक्षांना धडा शिकवेल, असे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी इम्पक्ट24 शी बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर (प.) चे श्री. भूषण भाऊ फुसे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर ( प.) तथा तालुका निरीक्षक रमेश लिंगमपल्लिवार, जिवती तालुका अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, राजुरा तालुका अध्यक्ष सुशिल मडावी, भगीरथ वाकडे, अभिलाष परचाके यासह गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव रघु मेश्राम, जिवती तालुका अध्यक्ष हनुमंत कुमरे, जिवती चे नगर सेवक जिवती तथा माजी तालुका अध्यक्ष मामताजी जाधव, पाचगाव घनागुडा पेसा अध्यक्ष गंगुजी रामु कुमरे, गो.गपा. नेते बापुराव मडावी, गो.ग.पा. युवा नेते गजानन जुमनाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here