गतिरोधक बनवण्यासाठी मनसे चे अभियंत्याला निवेदन

0
702

गतिरोधक बनवण्यासाठी मनसे चे अभियंत्याला निवेदन

कोरपना प्रतिनीधी
मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर आणि राजू गर्गेलवार राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालयाला निवेदन दिले.
मनसेचे अक्षय भांदक्कर व राजू गर्गेलवार गडचांदूर येथील माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके या चौकात स्पीड ब्रेकर लावण्यासाठी आमदार सुभाष धोटे,उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चंद्रपुर आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचंदुर यांना निवेदन देण्यात आले. माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके चौकापासून दोन चाकी, चार चाकी व इतर जड वाहने जलद गतीने धावतात. मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर व राजू गर्गेलवार ३१/०३/२०२२ ला निवेदन दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास दोन व्यक्तींचा बस स्थानक येथे दोन चाकी ने रस्ता ओलांडताना अपघात झाला. कुठेतरी त्या वाहनांची धावण्याची गती रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर लावणे महत्त्वाचे आहे माणिकगड चौकातून जड वाहने जलद गतीने धावत असताना येणाऱ जाणाऱ करणाऱ्या नागरिकांना भीतीचे वातावरण झाले आहे. तसेच बस स्थानकाजवळ व्यापार वर्ग, व इतर प्रवासी रस्ता ओलांडतांना जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. विर बाबुराव शेडमाके चौकामध्ये सावित्रीबाई फुले महाविद्यालय शाळा असून त्या चौकातून येणारे जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनींना, कामगार वर्ग व नागरिकांचे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहे. ह्याच मुद्द्यांना घेऊन मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर व राजु गर्गेवार यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालयात निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here