स्मार्ट ग्राम बिबी येथे नृत्याविष्कार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
692

स्मार्ट ग्राम बिबी येथे नृत्याविष्कार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कोरपना/प्रतिनिधी : जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथे नृत्याविष्कारचे आयोजन नुकतेच पार पडले. त्यात फॅशन शो, आई-मुलगी नृत्य व समूहनृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आई-मुलगी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती देरकर व वाणी देरकर यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक अश्विनी कोहळे यांनी व तृतीय क्रमांक भूमिका व मोनिका यांनी पटकाविला. तर समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक रामनगर ग्रुप द्वितीय क्रमांक कविता कुमरे ग्रुप व तृतीय क्रमांक पल्लवी सोनुले ग्रुप यांनी पटकाविला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला एलआयसी व अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण आनंदराव पावडे, कवडु पिंपळकर, रामदास देरकर, प्रा. आशिष देरकर, विठ्ठल टोंगे व शामकांत पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता काकडे, साक्षी पाचभाई व अनामिका शील यांनी केले. प्रास्ताविक भारती पिंपळकर यांनी केले. यशस्वितेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here