आज गोंडपिपरी आणि पोंभुर्णा येथे जय भवानी कामगार संघटनेच्या शाखेचे जल्लोषात अनावरण

0
565

आज गोंडपिपरी आणि पोंभुर्णा येथे जय भवानी कामगार संघटनेच्या शाखेचे जल्लोषात अनावरण

🚩जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक श्री. सुरज ठाकरे यांनी गोंडपिपरी, पोंभुर्णा क्षेत्रांमधील विविध गावांमध्ये स्वतः पोहचून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व शक्य तितक्या समस्यांमध्ये स्वतः हस्तक्षेप करून लोकांना न्याय देखील मिळवून देण्याचे काम सातत्याने करीत असल्यामुळे त्यांच्या याच कामाशी प्रेरित होऊन आज दिनांक:- ०५/०३/२०२१ ला गोंडपिपरी येथील गांधी चौक मध्ये आणि पोंभूर्णा येथील सावित्रीबाई फुले चौक येथे आज कामगारांसह जनसामान्यांनी देखील जय भवानी कामगार संघटनेच्या फलकाचे श्री. सुरज ठाकरे यांच्या हस्ते जल्लोषात अनावरण/ उद्घाटन केले.

श्री. सूरज ठाकरे यांनी या आदी देखील या क्षेत्रातील स्थानिक कामगारांकरिता आंदोलन, साखळी उपोषण- आमरण उपोषण या सर्व गोष्टीचा पवित्रा घेऊन कामगारांना न्याय मिळवून दिले. व या क्षणी श्री. सुरज ठाकरे यांनी कामगारांच्या बाबतीत जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्या त्या वेळेस जय भवानी कामगार संघटना नक्कीच न्याय मिळवून देईल असा विश्वास देऊन कामगारांना दिलासा दिला. यावेळी निखील बजाईत, राहुल चव्हाण, व ( गोंडपिपरी )येथील शाखा अध्यक्ष रवींद्र गेडाम, तालुका प्रमुख बब्बू पठाण, शाखा सचिव मोहित मानकर, कोषाध्यक्ष संतोष बोलीवार, काशिनाथ ईटेकर, विशाल कुडमेथे, सहसचिव अरुणा झाडे. व (पोंभुर्णा) येथील शाखा अध्यक्ष अंकुश गदेकार,
शाखा सचिव पदमाकर बोलीवार, कोष्याधक्ष मनोज गनवीर,
महिला प्रमुख दर्शना गेडाम व समस्त कामगार व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here