नवजात अर्भक मृत्यू प्रकरणी पित्याला अटक
तालुका प्रतिनिधी
चिमूर :

– सोमवारी सकाळी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड नंबर १ या गजबलेल्या आणि जिथे आरोग्य कर्मचारी स्टाप तैनात असते अश्या वॉर्डमधील रुग्णांना वापराचे शौचालयात ७ महिन्याचे मृत भृण (मृत बालिका)आढळुन आल्याने ते बाळ जिवंत पनी मारून टाकले की कुमारी मातेचे बाळ की अवैधरित्या तर गर्भपात केला नाही ना ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतांना आता शवविच्छेदन अहवाल ,सिसी टीव्ही फुटेज आणि पोलिस तपासता त्या मृत अभ्रकाचे उलघडे होत असून पोलिसांनी बाळांचे वडील रोशन बबन वाघमारे रा . कन्हाळगांव ता .चिमूर यास अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे .त्यामुळे नेमकं काय घडले हे यातून उलगडा होणार आहे
उपजिल्हा रुग्णालयात मृत बालिकेचे भृण आढळुन आल्याने संपूर्ण चिमूर तालुक्यात खळबळ माजली होती तरी नेमके ते बाळ कोणाचे? आणि शौचालयात का फेकण्यात आले ? उपजिल्हा रुग्णालयात तर काही गैरप्रकार होत तर नसेल ना ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नेमकं पोलीस तपासात काय उघड होते यावर अवलंबून असून संबंधित कर्मचारी -अधिकारी यांचे बयान पोलीस नोंदविणे सुरू होते तर पोस्टमार्टम रिपोर्ट यावर सर्व अवलंबून होते आणि सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी पडताळून पाहाले तेंव्हा रविवारी सायंकाळी चिमूर तालुक्यातील कन्हाळगांव येथील रोशन बबन वाघमारे व त्यांची पत्नी व एक मुलगी हे त्या शौचालया कडे जातांना दिसतात त्यात महिलेला कळा लागल्याने ती शौचालयात गेली आणि पती व मुलगी बाहेर होते पण काही वेळात ती ओरडल्याने पती तिकडे बघितला असता तिला प्रसूती होऊन बाळांचे डोके बाहेर पडले तेंव्हा पती पत्नीने ७ महिन्याच्या मुलीला जन्म दिला पण घरी एक मुलगा फिट येतो ,तर दुसरी मुलगी सुद्धा आजारी असत्ते त्यामुळे मुलगी नको या कारणांमुळे तिला मारून शौचालयात टाकले असे सांगण्यात येत आहे असे सूत्रांनी सांगितले असून तो वडील हा या रुग्णालयात २०१४ ते २०१८ या कालावधीत कंत्राटी कर्मचारी देखील होता असे कळते तेंव्हा नेमका काय प्रकार घडला यांचे पोलीस तपासात पुढे येईलच
तरी पण एका महिलेची शौचालयात,प्रसूती होते, मुलगी झाली म्हणून मारलं जात, प्रसूत झालेली महिला ,पती आणि ती मुलगी हे सर्व इकडेतिकडे जात येत असताना की प्रसूती पश्चत देखील त्या वॉर्डात नर्स , डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाला काहीच ठाऊक नसेल तर नवलच म्हणावे लागेल ? आणि पूर्ण रात्र उलटून दुसऱ्या दिवशी मृत अभ्रक शौचलयात दिसने नेमकं काय ? तर सोमवारी जेव्हा सफाई कामगार शौचालय सफाई साठी गेले असता प्रकार उघडकीस आला त्यामुळे फिर्यादी राजेश सुबराव शेट्टी सफाई कामगार उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांचे तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील संडास मध्ये अज्ञात इसमाने नवजात मुलीच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील संडास मध्ये टाकून अपत्यजन्माचे लपवणूक केलेली आहे अशा फिर्यादीवरून अज्ञात इसम विरुद्ध पोस्ट चिमूर येथे 318 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असता आता पोलिसांनी गुरुवारी बाळांचे वडील रोशन बबन वाघमारे रा . कन्हाळगांव ता. चिमूर यास अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे .त्यामुळे नेमकं काय घडले हे यातून उलगडा होणार आहे.