चंद्रपूर शहरात अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदे द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन

0
294

चंद्रपूर शहरात अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदे द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन

राजु झाडे

चंद्रपूर शहरात १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, शाखा चंद्रपूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सध्या देशात जिकडे- तिकडे कोरोनाचा खुप मोठा प्रादुर्भाव चालू आहे. त्यामुळे रक्तदात्याची खुप आवश्यकता असल्यामुळे चंद्रपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या टीमने येऊन हा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यास मदत केली.एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे पुरुष अध्यक्ष मा. राजेंद्रजी गुंडावार तसेच महिला अध्यक्ष मंदाताई पडवेकर यांनी खुप परिश्रम घेतले. या कोरोना संक्रमाणामुळे महामारी चालू असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुंडावार व मंदाताई पडवेकर यांनी स्वतःही रक्तदान केले.
यावेळी मंचाचे पदाधिकारी परख खडोले, आरती टोके,प्रिती रामटेके, निलिमा खडोले, आणि अर्चना मुंधडा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here