घरकुल योजनेमध्ये ग्रामपंचायतीतील सातही सदस्याला घरकुल लाभ ; पण खरे लाभार्थी योजनेपासून वंचित
गोंडपिपरी तालुक्यातील अडेगांव येथे प्रकार समोर
गोंडपिपरी :- अडेगांव या गावातील एकाच ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच यासह सातही सदस्याला घरकुल योजनेचा लाभ मिळल्याचं समोर आलं आहे. आपल्या सदस्यत्वाचा फायदा घेऊन स्वतःच्या नावे घरकुल योजनेचा लाभ घेतला मात्र गरजू लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने ग्रामस्थांत प्रचंड संताप दिसून येत आहे. यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेमुळे त्यांच्या स्वप्नातील घर साकार करण्याची संधी मिळते. त्यामुळे केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना किंवा शबरी आवास योजना राबवण्यात येते. या योजनेमुळे गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होते. पण मात्र अडेगांव या ग्रामपंचायतीत घरकुल योजनेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे सातही सदस्याला घरकुल योजना मिळाल्याचं समोर आलं आहे. ज्यांचे घर कुडाचे किंवा मातीचे आहे, जे लोक बेघर आहेत अशा गरीबांना स्वत:चं हक्काचं असं पक्क घर शासनाच्या पंतप्रधान आवास योजना या घरकुला योजनेच्या माध्यमातून मिळते. हा या योजनेचा सर्वसाधरण नियम आहे. पण अडेगांवमध्ये या नियमाची पायमल्ली झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. यामधील सातपैकी सात सदस्यांची घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना त्यांच्या घरासाठी सातही सदस्यांच्या नावाने पहिला हफ्ता देखील मिळाला आहे. यामुळे प्रत्यक्ष मोका चौकशी करून प्रसाशानाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.