विरुर स्टेशन येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अविनाश रामटेके यांची निवड
विरुर स्टेशन : विरुर येथील ग्रामपंचायत भवनाच्या प्रांगणात ग्रामपंचायत च्या वतीने २७ सप्टेंबरला पुरुष व महिला सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर विविध चर्चा करण्यात आली होती. यात शासकीय योजना करिता लाभार्थीची निवड,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२४-२५ करिता सुधारित आराखडा तयार करणे, आशा वर्कर निवडीबाबत शिफारस करणे, रोजगार हमी योजने करिता सन २०२५-२६ कृती आराखडा तयार करणे, मागील सभेचे अहवाल वाचन करणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पूर्व रचना करुन अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत ग्रामसभा घेण्यात आली होती.
यात महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष समितीच्या पदासाठी पाच नावे सुचविण्यात आले. यात भीमराव पाला, अविनाश रामटेके, शामराव कस्तुरवार, उमेश मोरे, अतुल उपरे या पाच व्यक्तीचा अध्यक्षपदी पदाकरिता समावेश होता. यात उमेश मोरे, शामराव कस्तुरवार, अतुल उपरे यांनी वेळेवर आपली माघार घेतली त्यामुळे दुहेरी लढत झाली होती. यात अविनाश रामटेके यांनी १५३ मते मिळवुन आपला विजय प्राप्त केला तर भिमराव पाला यांना ७१ मतांवर समाधान मानवे लागले.
यावेळी उपस्थित सभेचे अध्यक्ष सरपंच अनिल आलम, उपसरपंच प्रीती प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी गोपाल नैताम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल लांडे, पोलीस हवालदार देवाजी टेकाम, माजी सरपंच भास्कर सिडाम,अजय रेड्डी, अजित सिंग टाक, ग्रामपंचायत सदस्य अशील आलम, प्रदीप पाला, गयाबाई टेकाम, सविता आत्राम, सुनीता ईग्रपवार, रत्नमाला उपरे व आदी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.