सरकारने मागणीनुसार शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करावा – एम.पी.जे जिल्हा अध्यक्ष मो.अतिकूर रहेमान

0
421

अकोला विशेष/ प्रतिनिधी शकील खान

 

अकोला :- महाराष्ट्रात कोरोनाचे तांडव सुरू सुरूच आहे . मृतांचा आकडा चिंताजनक आहे . गेल्या दोन महिन्यात 36 हजार पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहे . राज्यातील 18 जिल्हे अद्याप रेडझोन मध्ये आहेत .कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी प्रमाणे लॉक डाउन चा अवलंब केला आ हे .सरकारच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे संसर्ग होण्याच्या घटनांची संख्या दररोज कमी होत आहे . लॉकडाऊन नामक कडू औषधाचा सकारात्मक परिणाम सरकारला दिसत असला तरी त्याचे दुष्परिणाम कोरोनापेक्षा कमी भयावह नाहीत .

 

आधीपासूनच मंदीत असलेल्या अर्थव्यवस्थेवर मोठा नकारात्मक प्रभाव पडला आहे .जी डी पी आणि विकासाचा दर राहू द्या , लॉक डाऊन मुळे लाखो लोकांसमोर दोन वेळच्या जेवणाची नियोजन करणे मोठे आव्हान बनले आहे .राज्यातील लाखो लोकांनी नोकऱ्या गमावले आहेत .एका सर्वेक्षणानुसार लॉक डाऊन मुळे उच्च उत्पन्न गटातील जवळपास 84 टक्के लोकांना त्रास सहन करावा लागला आहे . जर उच्च उत्पन्न गटातील लोकांची स्थिती अशी असेल तर मध्यम व निम्न उत्पन्न गटाच्या स्थितीचे चांगल्याप्रकारे मुल्यांकन केले जाऊ शकते .

 

लॉक डाऊन मुळे गरीब, रोजंदारी आणि अनौपचारिक वर्गातील कामगारांना सर्वात जास्त आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे . लोकसंख्येच्या मोठ्या भागावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे . लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी सरकारने शिव भोजन थाळी विनामूल्य केली आहे . 13 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात गरीब व गरजू लोकांना विनामूल्य शिवभोजन थाळी योजना जाहीर केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here