दुचाकीच्या अपघातात एक ठार
सातारा तुकुम गावाजवळील घटना

पोंभुर्णा प्रतिनिधी :- गोमपाटिल तुकुम येथुन चंद्रपूर येथे जात असताना दुचाकिचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सातारा तुकुम गावाजवळ घडली.
मृतकाचे नाव आकाश मडावी वय ३५ असुन तो गोमपाटिल तुकुम येथील रहिवासी आहे. अपघातानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पुढिल तपास उमरी ठाणेदार कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी पोलिस करीत आहेत.