गायींच्या मागे धावला वाघ, परिसरात दहशत

163

गायींच्या मागे धावला वाघ, परिसरात दहशत

वेकोली वणी क्षेत्राच्या पैनगंगा खदानी जवळ असलेल्या चेक पोस्ट जवळून महालक्ष्मी कॅम्पकडे काल दिनांक 18.10.2022 ला पहाटे 4 वाजून 8 मिनिटांनी एक वाघ गायीच्या मागे धावत जात असतानाचा विडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. ही घटना पैनगंगा व कोलगाव खदानीत काम करणाऱ्या कामगारांना माहिती होताच कामगार वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

दिनांक 17 ऑक्टोबरला वेकोलीच्या कैलाशनगर वसाहतीजवळ असलेल्या ट्रांजिस्ट होस्टल जवळ एक वाघ दोन पिलासह दिसून आल्याचे येथील स्थानिक कामगारा मध्ये चर्चा आहे. तरी याची वनविभागानी चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वेकोलीच्या कामगार वर्गानी केली आहे

advt