कढोली (बूज) येथे विलगिकरण केंद्राचे उदघाटन

0
712

कढोली (बूज) येथे विलगिकरण केंद्राचे उदघाटन

राजुरा, विरेंद्र पुणेकर : आज काढोली येथे कोविड 19 विलगिकर्ण केंद्रांचे उदघाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्राम स्तरावरच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना गावातील एखाद्या इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करून विलागीकरण केंद्र उभारले पाहिजे या संकल्पनेतून मौजा- काढोली (बूज) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (P.H.C) असल्याने संलग्न लागून असलेल्या श्री.साईनाथ विद्यालल्यामध्ये विलागीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली त्या प्रसंगी जी.प चंद्रपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.सुनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सोबतच रुग्णांना दिलासा देत स्वतःच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांना वेडो वेडी कळवत राहावे सोबतच ऑक्सिजनची कोनटिंग दिवसातून किमान चारदा केलीच पाहिजे असे श्री. सुनील भाऊ यांनी सांगितले आणि उपस्थित डॉक्टरांना सुद्धा विलागीकृत व्यक्तींकडे सातत्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले त्या प्रसंगी श्री.सुनील भाऊ उरकुडे यांनी विलागीकृत सर्व व्यक्तींना नारळ, फळें वितरण केले. त्या प्रसंगी श्री.राकेश हिंगणे सरपंच काढोली, श्री.पुरुषोत्तम लांडे उपसरपंच कोलगाव, श्री.सुरेंद्र आवारी सरपंच चार्ली , काढोली (बूज) प्राथमिक आरोग्य केंद्र (P.H.C) चे प्रमुख आरोग्य अधिकारी श्री. डॉ. विपीन कुमार ओदेला, आरोग्य अधिकारी डॉ. शुभश्री तळवी, अक्षय निब्रॅड व इतर कर्मचारी गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here