यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
370

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारतचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सजारी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूखतेने उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राकेश पिंपळकर, रुपेश झाडे, राशिद हुसेन, सायली येरणे, विमल काटकर, अनिता झाडे, शमा काजी, माधूरी निवलकर, गोपी मित्रा, मुन्ना जोगी, बाळकृष्ण जुवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here