येल्लापूर ग्रामपंचायतीत आदिवासी महिलेस सरपंच करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व ताकद पणाला लावणार- भूषण फुसे

0
480

येल्लापूर ग्रामपंचायतीत आदिवासी महिलेस सरपंच करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व ताकद पणाला लावणार- भूषण फुसे

 

 

जिवती : 25 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दुसऱ्यांदा येल्लापूरला भेट देऊन 7 सदस्यांचे संपूर्ण पॅनल निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याची खात्री केली. वंचित बहुजन आघाडी सर्व बहुजनांचे प्रतिनिधित्व करते म्हणून पक्षाने एका आदिवासी महिलेला सरपंचपदासाठी उमेदवारी दिली आहे आणि कोलाम आदिवासी समाजातील 4 पुरुष उमेदवारही उभे केले आहेत.

 

पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, वैद्यकीय सेवा या मूलभूत गरजांपासूनही येल्लापूर ग्रामस्थ वंचित होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देऊन विकास आणि सुशासनाचा मार्ग प्रशस्त करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी बालाजी कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोमाजी गोंडाणे सर, जिवती तालुका प्रमुख बालाजी सोनकांबळे, युवा नेते सिद्धू चंदनखेडे, सुमेध चिकटे, दशरत गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here