प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांच्या नेतृत्वात आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र “शेतकरी संवाद यात्रा” चंद्रपुर जिल्ह्यात

0
398

प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांच्या नेतृत्वात आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र “शेतकरी संवाद यात्रा” चंद्रपुर जिल्ह्यात

दिनांक 26 सप्टेंबर 2022
आम आदमी पार्टी शेतकरी संघटनेची स्थापणा झाल्यानंतर आप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील,सल्लागार व ऑटो वाहतूक विंग चे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत आचार्यां, संघटनमंत्री बाबासाहेब चव्हाण, विदर्भ संपर्क प्रमुख व वाशीम जिल्हा प्रमुख मनीष मोडक यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सम्पूर्ण विदर्भातील शेतकरी राज्या सोबत त्याचे शेतीविषयक समस्या, शासनाधीन असलेल्या योजना विषयक समस्या, सबसिडी बाबत समस्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबतीत समस्या व प्रादेशिक रचनेनुसार इतर समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी कष्टकरी बांधवांच्या सोबत संवाद यात्रा काढण्यात आली.

ही आम आदमी शेतकरी संघटना यात्रा चंद्रपुर मध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2022 आली. त्यांचे स्वागत चंद्रपुर जिल्हा महानगरचे संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर, सहसचिव अजय डुकरे, बूथ कार्यकर्ते श्रवण ईश्वरकर, पक्षाचे जेष्ठ कार्यवाहक मनोहरराव पाटील साहेब तर्फे करण्यात आले.

त्यानंतर याच संवाद यात्रेत समिलित होऊन चंद्रपुर जिल्ह्यातील तालुका पोम्भूर्णा गाव वेळवा येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी स्व रणधीर जनार्धन जाधव यांचे गावात येऊन आत्महत्येची कारणांचा शोध घेत त्यांना हवी ती संपूर्ण मदत करण्यासाठी संपूर्ण पक्ष आत्महत्या ग्रस्त बळीराज्या सोबत आहो असे सांगून त्या बळी राज्याच्या आत्महत्येनंतर त्यांचे कुटुंबाची मदत करण्यासाठी सुनील रत्नाकर भोयर यांचेवर जबाबदारी देण्यात आली.

याच दिवशी सांयकाळी ६ वाजता हा कार्यक्रम संपल्यावर त्यांनंतर लगेच समोरच्या कार्यक्रमास बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे चंद्रपुर जिल्हा संघटनमंत्री परंजितसिंग, जिल्हा विधी संयोजक किशोर पुसलवार, तालुका पदाधिकारी नारद प्रसाद, समशेर सिंग चौहान, डॉ. अनिल वंगलवार व इतर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांचे अध्यक्षतेखाली शेतकरी बांधवांची सायंकाळी ०७ वाजता तेथील हनुमान मंदिरात शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जाहीर सभा करण्यात आली. या जाहीर सभेत गावातील १०० ते १५० लोक हजर होते. त्या सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्यात आली. त्यांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम आदमी शेतकरी संघटना सदैव तत्पर राहील हे सुध्दा सांगण्यात आले. तसेच आप राजुरा तालुका अध्यक्ष रोशन येवले, पदाधिकारी स्वप्नील कोहपरे यांनी पण शेतकरी प्रदेशाध्यक्ष यांचे सोबत भेट घेऊन चर्चा केली व सभेची सांगता करण्यात आली.

त्यानंतर याच दिवशी रात्री १० वाजता आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर च्या महिला आघाडी संयोजिका ऍड. सुनीता पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार त्यांचे घुटकाला येथिल पक्षाचे कार्यालयात पाहुण्याचे आणि संवाद यात्रेतील सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेतकरी समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडविता येईल, शेतकरी पुत्रांद्वारे रोजगार कसा निर्माण करून घेता येईल यावर चर्चा करण्यात आली. यानंतर लगेच पाहुण्यांच्या साठी मनोहरराव पाटील यांचे तर्फे कार्यकर्त्या समवेत स्नेहभोजना कार्यक्रम करण्यात येऊन या चंद्रपुरातील शेतकरी संवाद यात्रेची सांगता करण्यात आली.

बुलढाणा येथून या संवाद यात्रेची सुरुवात होऊन वाशीम येथे दिनांक 26 सप्टेंबर ला या यात्रेची सांगता होणार आहे.

चंद्रपुर जिल्हा व शहरात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनेकांचे हात लागले. त्या सौ. आरती आगलावे, रहेमान भाई, किशोर पुसलवार, समशेरसिंग, डॉ. अनिल, वेळवा येथील मुरलीधर मोरे, दिनकरराव भंडारे, सदाशिवराव मोरे, डॉ. देवेंद्र अहेर, भिवराज सोनी, बशीर भाई व अनेकांनी श्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here