अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन 

0
226

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज 6 डिसेम्बर रोजी घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महात्मा गांधी जुनिअर कॉलेज गडचांदूर येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमात आग कशी लागू शकते, लागल्यास त्या पासून काय हानी होऊ शकते व त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे प्रत्यक्षिका द्वारे माणिकगड सिमेंट वर्क्सच्या विभागाने शाळेतील एकूण 700 विध्यार्थी आणि शिक्षकांना समजवून सांगितले. प्रत्यक्षिकात आग लागल्यावर्ती अग्निरोधक कसे वापरावे हे विध्यार्थी व शिक्षक वर्ग याना समजवून सांगितले . कार्यक्रमा दरम्यान मुलांना प्रश्न विचारण्यात आले आणि विध्यार्थ्यांना पुरस्कृत सुद्धा केलेत.
या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य ,स्मिता चिताडे मॅडम, उप प्राचार्य माहुरे सर तसेच माणिकगढ संघ आणि शाळेतील शिक्षक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमांक वेळी प्राचार्य चिताडे मॅडम यांनी बोलतांना म्हटले कि हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून या पासून आम्हाला व विध्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षे बद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व शिक्षक वर्गानी या कार्यक्रमांची मनशोक्त प्रसंशा केली व असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे अशी विनंती सुद्धा केलीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here