जागतिक वसुंधरा दिनानिमित्त रोपटे रोपण उपक्रम

0
503

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त रोपटे रोपण उपक्रम

चंद्रपूर : स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक, वृक्षमित्र मंदाताई पडवेकर यांनी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चंद्रपूर तथा विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने व कोरोनाच्या सावटाखाली शासनाच्या सर्व नियमांचे यथायोग्य पालन करत आपल्या घराच्या अवती-भावतीच्या परिसरात कडुलिंब, सीताफळ, पिंपळ, गोडलिंब, चिकू अशा अनेक रोपट्यांचे रोपण करून आपल्या परीने निसर्गाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यासह त्यांचे सहकारी अनिल पडवेकर उपस्थित होते.
मंदाताई गेले कित्येक वर्षापासून विविध फळांचे ‘बीजारोपण’ करून रोपटी तयार करतात आणि ती रोपटी कुणाचा वाढदिवस, सण, जयंती निमित्ताने रोपटे रोपण उपक्रम राबवून रोपट्यांचे रोपण करीत असतात.
एक झाड तब्बल तेवीस (२३) लाख रुपयांचा ऑक्सिजन एक वर्षाला देतो. आजची वस्तूस्थिती लक्षात घेता समाज बांधीलकी जपून जन्म-मृत्यू असो वा सण-उत्सव एकतरी रोपटे नक्कीच लावावे. आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा.
रोपटी लावा, जगवा व त्याचे वृक्षात रूपांतर करा असा संदेश मंदाताई पडवेकर यांनी जनतेला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here