राजुरा वासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात माँ शक्ती गरबा महोत्सवाची सांगता…

0
261

राजुरा वासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात माँ शक्ती गरबा महोत्सवाची सांगता…

देवरावसारखा धडपडणारा कार्यकर्ताच, नेता म्हणून पुढे येतो! – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

विघ्नसंतोषी फेल, दादाच्या दांडियाचीच सर्वत्र चर्चा

राजुरा, दि. २५ आक्टोंबर : येथील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून दि. १४ आक्टोंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या माँ शक्ती गरबा महोत्सव-2023 ची सांगता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
रविवारी (दि. २२) रोजी अष्टमीच्या दिवशी आयोजित केलेल्या महास्पर्धेला उपस्थित राहून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा वासीय गरबाप्रेमींचा उत्साह वाढवला.
याठिकाणी अष्टमीचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी राजुरा ०९ प्रतिभाशाली महीलांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये कृतिका सोनटक्के, चित्रलेखा धंदरे, माधुरी भोंगळे, करूणा जांभुळकर, रोशनी जांभुळे, शालिनी बोंथला, अलका सदावर्ते, वर्षा कोयचाळे आणि शिला जाधव यांचा समावेश आहे.
त्यानंतर पार पडलेल्या महास्पर्धेत विजयी ठरलेल्या प्रथम वैदेही कुलकर्णी, द्वितीय समीर बोरकर तर तृतीय अदिती रामगीरवार यांनाही पारीतोषीकांचे वितरण करण्यात आले; यासोबतच लकी ड्रॉ व लहान मुलांच्या स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिकांचे वितरण ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते पार पडले.

याठिकाणी बोलतांना, नवरात्रीचा हा आध्यात्मिक उत्सव म्हणजे माँ शक्तीच्या उपासनेचा, उर्जेचा जागरोत्सव असतो. माँ आदीशक्ती तुम्हा सर्वांना सकारात्मक उर्जा प्रदान करो; आज अष्टमीच्या पावन दिनी तुमच्याशी भेटून मला आनंद होत आहे. याचसोबत समाजामधे सेवाभावी वृत्तीनं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान याठिकाणी करण्यात आला; याहून मोठे दुसरे कार्य नाही. त्यामुळे त्या भगीनींनाही मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पुढे बोलताना, राजुरा विधानसभा क्षेत्र प्रगतीच्या, विकासाच्या मार्गावर पुढे जावा; यासाठी तुम्ही जे आशिर्वाद देत आहात, ते लाखमोलाचे आहेत. याठिकाणी देवरावजी व त्यांच्या टीमचे कौतुक करावेसे वाटते. मागील दोन महिन्यांपासून ते राजुरा शहरात विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित करताहेत, येथील सेवा केंद्रही गोरगरीबांच्या सेवेसाठी निरंतर सुरू आहे. मी मागेही म्हटले होते की “जो करता है सेवाभाव, उसका नाम है देवराव” तसेच सेवाभावी कार्य ते करतात. ते आधीपासूनच धडपडणाऱ्या वृत्तीचे आहेत, त्यामुळे असा सेवेसाठी धडपडणारा कार्यकर्ता पुढे येऊन नेता बनतो हे आवर्जून नमुद करण्यासारखे आहे. असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकपर भाषणात, कोणतेही चांगले कार्य सिद्धीस नेतांना विघ्न हे येतच असतात त्यामुळे आपल्याही गरबा महोत्सवात विघ्न घालण्याचे काम काही संकुचित विचारांनी करण्याचा असफल प्रयत्न केला, पण आईजगदंबेचा आशिर्वाद आणि आपल्या सारख्या माता-भगगीनींचा पहिल्या दिवसांपासूनचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्या विघ्नसंतोषींवर रामबाण ठरला. आदरणीय सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनात या भागाचा विकास व जनसेवा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यापुढेही आपले सहकार्य असेच राहुद्या. अशी भावना आयोजक देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला, आरपीआयचे नेते सिद्धार्थ पथाडे, चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, संजय उपगण्लावार, अरुण मस्की, सुरेश रागीट, मिलिंद देशकर, विनोद नरेन्दुलवार, सचिन बैस, भाऊराव चंदनखेडे, महेश रेगुंडवार, नितीन वासाडे, सोमेश्वर आईटलावार, प्रशांत गुंडावार, राधेश्याम अडाणीया, सईद कुरेशी, दिलीप गिरसावळे, सुरेश धोटे, वाघू गेडाम, सय्यद अली, सय्यद चांद, प्रज्वलंत कडू, सुरज पेदूलवार, सुनिल डोंगरे, अजय राठोड, मोहन कलेगुरवार, छबिलाल नाईक, रत्नाकर पायपरे, दिपक झाडे, सत्यम गाणार, माजी पं.स. सदस्या सुनंदा डोंगे, माजी नगरसेवक उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, ममता केशट्टीवार, सिमा देशकर, स्वरूपा झंवर, शुभांगी रागीट, शितल वाटेकर, माणिक उपलेंचवार, प्रियदर्शनी उमरे, राणी नळे, योगीता भोयर, अर्चना भोंगळे, वैशाली ढवस, सचिन भोयर, राजकुमार डाखरे, केतन जुनघरे, मयुर झाडे, आसिफ सय्यद, मिथुन घिवे, स्वप्निल पहानपटे, अंकुश कायरकर, चेतन काटोले, छोटू मसादे, शुभम राखुंडे, लुकेश होकम, वैभव पावडे, अमोल मोरे, वैभव पावडे आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here