“अभूतपर्व कार्य” चंद्रपूर येथील डॉ. प्रवीण येरमे देवासारखे धाऊन आले गरीब कोरोना रुग्णांच्या मदतीला

0
1100

“अभूतपर्व कार्य” चंद्रपूर येथील डॉ. प्रवीण येरमे देवासारखे धाऊन आले गरीब कोरोना रुग्णांच्या मदतीला

चंद्रपूर/प्रतिनिधी : एकीकडे खाजगी डॉक्टर्स कडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट तर दुसरीकडे डॉ. येरमे आपल्या सामाजिक संस्था ग्राम आरोग्य सेनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत इलाज व मार्गदर्शन करत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम आरोग्य सेनेचा रुग्णसेवक तयार करण्याचा डॉक्टर प्रविन येरमे यांचा मानस आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील गोरगरीब लोकापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल.
कोरोना संकटकाळी रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडून जर लुटण्याच्या धंदा होतं असेल तर डॉक्टरी पेशाला हा कलंकच म्हणावा लागेल. कारण पैसे कमाविण्याच्या नादात डॉक्टर खरी सेवा विसरलेले असून त्यांनी आपल्या सेवेचा बाजार मांडला आहे. मात्र अशाही परिस्थितीत चंद्रपूर मधील एक डॉक्टर कोरोना संकटाला संधी न मानता आपले परम कर्त्यव्य समजून गोरगरिब कोरोना रुग्णांना मोफत तपासणी व सल्ला देऊन अभूतपूर्व कार्य करीत असल्याने जे डॉक्टर्स कोरोना रुग्णांकडून उपचारांच्या नावाखाली लाखों रुपये लुटतात त्या डॉक्टरांच्या थोबाडीत डॉक्टर येरमे यांनी मोफत आरोग्य सेवा देऊन एक चपराक मारली असल्याचे दिसत आहे.
डॉ. प्रवीण येरमे यांनी कोरोना रुग्णांची मोफत सेवा देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टरांमधे एक प्रकारची सेवा जागवली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सेवा देत गरजूं रुग्णांना गृह विलगीकरणासाठी त्या अर्ज भरुन घेतात आज त्यांच्या रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांच्या रांगा लागल्या आहे. चंद्रपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोविड केअर सेंटर, खासगी व सरकारी कोविड रुग्णालयात पाय ठेवण्यासाठीही जागा नाही. कोरोना रुग्णाच्या घरी विलगीकरणाची सोय असेल त्याला कुठलेही लक्षणे नसतील तर त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र त्यासाठी एका खासगी डॉक्टरांच्या सहीने अर्ज भरावा लागतो. परंतु या अर्जावर सही करण्यासाठी डॉक्टरांकडून चक्क हजारो रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
काही खासगी डॉक्टरकडून संधीचा फायदा घेत रुग्णांना लुटण्यात येत आहे. अशा डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून कारवाई करण्याची मागणी आहे.
यातील बहुतांश रुग्ण कोणतेही लक्षणे नसणारे आहेत. या रुग्णांना कोविड संबंधी बातम्यांमुळे विविध चाचण्या, सिटीस्कैन, इंजेक्शन इत्यादींसाठी रांगा लावून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपुरात घरातच विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांना डॉक्टर मंडळी ३ ते ६ हजार रुपये प्रतिरुग्ण शुल्क आकारत आहेत. गेल्या वर्षभर मंदीचा काळ असताना आर्थिकदृष्ट्या ढासळलेल्या कित्येक रुग्णांना हा भार पेलवणारा नाही. अशातच आपण घेतलेले शिक्षण या महाकाय संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या कामी यावे, यासाठी चंद्रपूरच्या महिला डॉ. येरमे हे कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आले. अस्वस्थ झालेल्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या व आधाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी त्यांनी मोफत उपचार सुरू केला आहे. एकदा व्यक्ती कोरोनाबाधित झाला की त्यावर होणारा खर्च रुग्णवाहिका, औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडीसीविर इंजेक्शन यामुळे रुग्ण व कुटुंब यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होते. मात्र डॉ. प्रविण येरमे यांनी समाजात अशा सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले ती सेवाभावी वृत्तीने शेकडो डॉक्टर्स पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here