मोफत ऑनलाईन कामगार नोंदणी शिबीराचे आयोजन

0
499

मोफत ऑनलाईन कामगार नोंदणी शिबीराचे आयोजन

चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे

जनसामान्यांच्या मदतीला सदैव तत्पर कार्यक्षमी कर्तव्यदक्ष युवा नेते भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री आशिष पिपरे यांच्या पुढाकाराने मोफत कामगार नोंदणी शिबीराचे आयोजन करुन आतापर्यंत ३०० च्या वर कामगारांचे कार्ड तयार करण्यात आले. ऑनलाईन कामगार नोंदणी करीता नाहक होणारा त्रास काही आॅनलाईन केंद्राकडून जनतेची लूट, व लोकांची उडालेली तारांबळ या सर्व बाबींचा विचार करून जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रिद उराशी बाळगून गोर-गरीबांची सर्वोतोपरी सेवा भावी मदत म्हणून शिबीराचे आयोजन केले आहे. तरी ज्या लोकांना कामगार नोंदणी पेट्यासाठी करायची असल्यास शिवम अगरबत्ती प्रकल्प गोंडमोहल्ला प्रभाग क्र ३ चामोर्शी येथे संपर्क करावा २४ तास सेवा सुरु आहे असे आवाहन आशिष अरुण पिपरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here