जनतेची कामे लवकर होण्यासाठी तहसिल कार्यालयातील कामांना गती द्या – आमदार डॉ देवराव होळी

0
451

जनतेची कामे लवकर होण्यासाठी तहसिल कार्यालयातील कामांना गती द्या – आमदार डॉ देवराव होळी

तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयातील प्रत्येक विभागात जावून कामकाजाची केली पाहणी

 

गडचिरोली, सुखसागर झाडे : तालुक्यातील जनतेचे काही ना काही काम तहसील कार्यालयाशी निगडित असून ते लवकर पुर्ण होत नाही . तहसील कार्यालयात लोकांना अकारण वारंवार फेरफटका माराव्या लागतात. त्यामुळे जनतेची कामे लवकर होण्यासाठी तहसिल कार्यालयातील कामांना गती द्यावी. असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले.

आढावा बैठकीला तहसीलदार महेंद्रजी गणवीर , पंचायत समितीचे उपसभापती विलासजी दशमुखे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहने , प. स.सदस्य शंकरजी नैताम यांचेसह तहसील कार्यालयातील प्रमुख विभागाचे नायब तहसीलदार, व अधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते.

बैठकीपूर्वी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयातील प्रत्येक विभागात जावून कामकाजाची पाहणी केली. त्यांच्या कामकाजाची विचारपूस करित उपस्थित अधिकाऱ्यांना कोणतीही कामे प्रलंबित न ठेवता तातडीने मार्गी लावण्यासाठी काम करा असे निर्देश दिले.
रेशन कार्ड बनविण्यासाठी, जमिनीच्या समस्यांसंदर्भात , अतिक्रमण जमिनीच्या पट्याचे प्रलंबित प्रश्न, वन हक्काचे प्रलंबित प्रकरण, पीक विम्याचे पैसे, इत्यादी लहान लहान कामासाठी लोकांना तहसील कार्यालयात दररोज यावे लागते. परंतू त्यांची कामे लवकर होत नाही.ती कामे लवकर व्हावी त्यात असणाऱ्या अडचणी कोणत्या, त्या दूर कशा करता येईल या दृष्टीने तहसील कार्यालय अंतर्गत विभागांची आढावा बैठक आमदार डॉ देवरावजी होळी यांनी आयोजित केली.
बैठकीमध्ये आलेल्या तक्रारींचे निवारण सोबतच प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आढावा दरम्यान आमदार महोदयांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना जनतेची अडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here