राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक युवकांचा जाहीर प्रवेश

0
504

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक युवकांचा जाहीर प्रवेश

 

प्रवीण मेश्राम/कोरपना
देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून रविवार 7 ऑगस्ट 2022 रोजी अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गाव तिथे राष्ट्रवादी, हे धोरण संपूर्ण महाराष्ट्रात हर एक पदाधिकारी कार्यकर्ता राबवित आहे, त्याचेच एक पाऊल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरपना तालुक्याने उचललेले आहे. गावाचा विकास व्हावा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, अशे ज्वलंत प्रश्न सुटावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
महापुरुषांचा विचार प्रत्येक घरा घरात पोहचवण्याचे काम सुद्धा करीत आहे. अश्या अनेक चांगल्या गोष्टी पक्षाच्या वतीने होत आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली तर तालुका अध्यक्ष शरदभाऊ जोगी, प्रविण काकडे जिल्हासचिव , जिल्हाउपाध्यक्ष सुनील अरकिलवार, ता. उपाध्यक्ष करण सिंघ बुरानी यांच्या नेतृत्वाखाली झाला.

कुकडबोळी गट ग्रामपंचायत या गावातील विलास आत्राम, विलास कुंभारे, रमेश आत्राम माजी ग्रा. प. सदस्य, प्रकाश मेश्राम, गणेश आत्राम, विशाल वागाडे, बबन मेश्राम, अशोक कंडे, जंगा पेंदोर, संबा कोडापे, पुरशोत्तम सोयाम, रामदास गेडाम, प्रकाश मेश्राम, जगदिश बोरडे, अजय कापटे, मनोज तुमराम, शंकर आत्राम, ओम कुमरे, विनायक जुमनाके, झित्रू येडमे, प्रदीप तिरणकर अश्या अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मयूर जोगी, अभिषेक तूरानकर आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here