वंचित बहुजन आघाडी ची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

0
591

वंचित बहुजन आघाडी ची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर, दि. २६ फेब्रु. : वंचित बहुजन आघाडी ची जिल्हास्तरीय आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी राजेश बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली २४ तारखेला पार पडली. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ समन्वयक राजू झोडे तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता गौरकर, महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांची उपस्थिती होती.

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मागदर्शन करताना राजेश बोरकर बोलले की प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधातील ही मोठी लढाई असून कार्यकर्त्यांनी बोलण्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करावे.
कुशल मेश्राम यांनी पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक गावात निर्माण करा. ‘गाव तिथे शाखा’ व ‘शाखा तिथे फलक’ निर्माण करा. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून पक्ष वाढीसाठी स्वतःला झोकून द्यावे. असे त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
राजू झोडे यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना कार्यकर्ता हा स्वाभिमानी व प्रत्येक सामुदायिक कार्यकर्ता निर्माण करत निवडणूकीच्या तयारीला जोमाने लागावे. वंचित बहुजन आघाडीची सर्वसमावेशक भूमिका खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहचवावी असे सांगितले.

आढावा बैठकीचे संचालन धिरज बांबोडे यांनी तर आभार रुपचंद निमगडे यांनी मानले. जिल्हातील प्रमुख पदाधिकारी व तालुका प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here