राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली च्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात भव्य निदर्शने

0
489

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली च्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात भव्य निदर्शने

गडचिरोली/सुखसागर झाडे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटीलसाहेब व जिल्हा गडचिरोली राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र वासेकर यांच्या निर्देशानुसार,”गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस” तर्फे,शहरातील विविध भागात होर्डिंग्जच्या व निदर्शनाच्या माध्यमातून देशात पेट्रोल डिजेल व घरगुती गॅस ची दरवाढ दिवसेंदिवस वाढत असून, आधीच कोरोना मुळे आर्थिक अडचणीत पडलेल्या जनतेला दिलासा मिळायच्या ऐवजी यामध्ये दरवाढ झाल्यामुळे आता सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाचे भाव प्रती बरल घसरत असून सुद्धा आपल्या देशात पेट्रोल चे भाव आगी प्रमाणेच चढत आहेत याचा सर्वात जास्त फटका मध्यम वर्गीय परिवाराला तसेच शेतकरी वर्गाला होत आहे. तसेच शेअर बाजार सुद्धा खड्यात गेलेले आहे. व सत्तेत यायच्या आधी दर वर्षी बेरोजगारांना 2 करोड रोजगार देऊ म्हणून सत्तेत आले होते परंतु या उलट सध्या देशात बेसुमार बेरोजगारी वाढलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे आज केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिजल गॅस दर वाढ, शेअर बाजार ,बेसुमार वाढलेली बेरोजगारी, आकाशाला भिडलेली महागाई च्या विरोधात गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली द्वारा केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे,ओबीसी जिल्हा अध्यक्ष विनायक झरकर,महिला जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके, उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा संघटन सचिव संजय शिंगाडे, शहराअध्यक्ष विजय धकाते,शहर उपाध्यक्ष कपिल बागडे, सलिम मन्सुरी,गुलाम जफार, शेख, रोशन,कालवाजी,मनोज ढोरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here