शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकानी विद्यार्थिनीचा केला विनयभंग

0
1450

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकानी विद्यार्थिनीचा केला विनयभंग

केम तुकुम येथील प्रकार

गावकरी व पालकांनी मुख्याध्यापकाला दिला चोप, पोलीसांनी केली अटक

राज जुनघरे
बल्लारपूर (चंद्रपूर) : महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, कालपासून शाळा सुरू झाल्या खऱ्या पण ज्या शाळेत विद्यार्थ्याना विद्यार्जन दिल्या जाते तिथेच गुरुजींच्या नियतीमधे खोट निर्माण झाली तर पालकांनी विद्यार्थिनीना शाळेत पाठवायचे कसे? हा गंभीर प्रश्न आता पालकांसमोर उभा ठाकला आहे, घटना आहे बल्लारपूर येथील तुकूमच्या जिल्हा परिषद शाळेतील जिथे भाऊराव तुमडे हे मुख्याध्यापक आहे आणि त्यांनी पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणि शाळेला कुलूप ठोकले. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती वर नियंत्रण मिळवले.व मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, कदाचित पोलीस पोहोचले नसते तर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाचे काय झाले असते ते सांगता येत नव्हते एवढे आक्रमक गावकरी झाले होते.
काल शाळेचा पहिला दिवस असल्याने काही मोजके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत पोहचले होते, मात्र इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या आदिवासी मुलीला अशा प्रकारे मुख्याध्यापकाने नीतीमूल्ये बाजूला सारून अश्लील चाळे करावे म्हणजे गुरु या शब्दाला काळिमा फासण्याचा प्रकार आहे.

मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठवल्यानंतर, एका आदिवासी मुलीच्या गुप्तांगाला त्यांनी हात लावल्याने विद्यार्थ्यांनीने घाबरून आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळतास विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर, पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली, बल्लारपूर पोलिसांचे एपीआय रमीज मुलाणी, एपीआय विकास गायकवाड, एपीआय शैलेंद्र ठाकरे, चंद्रकांत चंदे, रणविजय सिंह ठाकूर इ. पोलीस पथकाने उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले .पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here