माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्‍या निधनाने जनतेच्‍या सुखदुःखाशी समरस होणारा कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला

0
310

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्‍या निधनाने जनतेच्‍या सुखदुःखाशी समरस होणारा कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला

 

 

शिरूर ग्राम पंचायतीचे सदस्‍य ते विधानसभा सदस्‍य असा बाबुराव पाचर्णे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मतदार संघाच्‍या विकासासंदर्भात समस्‍यांची सोडवणूक करण्‍यासाठी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन प्रयत्‍नशील राहणारे बाबुराव पाचर्णे यांना सभागृहात जवळून अनुभवले असे मत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी कुटूंबात जन्‍मलेल्‍या पाचर्णे यांनी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना, राजकारणात कोणीही मार्गदर्शक नसताना आपल्‍या राजकीय कारकीर्दीला सुरूवात करणारे बाबुराव पाचर्णे यांनी आमदार म्‍हणून उत्‍तम कार्य केले. त्‍यांच्‍या जाण्‍याने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्‍यांच्‍या पुण्‍यात्‍म्‍याला परमेश्‍वर सद्गती देवो आणि या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटूंबियांना परमेश्वर देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here