राहुल गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर महिला काँग्रेस रस्त्यावर

0
410

राहुल गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर महिला काँग्रेस रस्त्यावर

नागपुरात ईडी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनादरम्यान चंद्रपूरच्या महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात

 

 

 

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी ने नोटीस बजावली. त्यानुसार आज ईडीने राहुल गांधी यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. ईडीची ही कारवाई राजकीय द्वेषापोटी असल्याने या विरोधात आज नागपूर येथे ईडी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार, या आंदोलनात चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात चंद्रपूर जिल्ह्यातुन शंभरपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी नम्रता आचार्य ठेमस्कर आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली व पोलीस मुख्यालयात नेले. यावेळी “जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है” पुलीस को आगे करता है अशा जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, राजुरा शहर जिल्हाध्यक्षा संध्या चांदेकर, बल्लारपूर शहर अध्यक्षा ऍड. मेघा भाले, तालुका अध्यक्षा अफसाना सययद, सिंदेवाही तालुका अध्यक्षा सीमा सहारे, गोंडपीपरी तालुका अध्यक्षा रेखा रामटेके, सावली नगराध्यक्षा लता लाकडे, सावली तालुका अध्यक्षा उषा भोयर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्षा मंगला लोनबले, शहर अध्यक्ष योगिता आमले, ममता डुकरे, जिवती तालुका अध्यक्षा नंदा मुसने, मेहेक सययद, पुष्पा नक्षणे, सरस्वती कोवे, माधुरी ठाकरे, सरिता गौरकर, निधी चौधरी यांच्या सह बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here