चंद्रपूरच्या दर्शीत जैनला खामगाव येथे बुद्धिबळ स्पर्धेत टोकन ऑफ लव्ह पुरस्कार

0
399

चंद्रपूरच्या दर्शीत जैनला खामगाव येथे बुद्धिबळ स्पर्धेत टोकन ऑफ लव्ह पुरस्कार

 

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची संलग्नाता असलेली बुलडाणा जिल्हा चेस सर्कल बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात व बाबूजी गोल्ड ईडीबल ऑइल खामगाव यांचे सहकार्याने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार २६ सप्टेंबर २०२१ रोजी मोहन मार्केट, खामगाव येथे करण्यात आले होते. करोनाची स्थिती लक्षात घेता नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत एकूण १६१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यात खामगावसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, परतवाडा, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, बल्लारशाह, जालना, नांदेड, औरंगाबाद, नगर, जळगाव, भुसावळ येथील प्रतिभावंत, इच्छुक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. स्पर्धेत एकूण ३० आंतररष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. विजेता बुद्धिबळ खेळाडूंना एकूण पंचवीस हजार रुपयांची रोख बक्षिसे तसेच ट्रॉफीज व प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आले.

स्पर्धेतील सर्वात लहान चंद्रपूर येथील ५ वर्षाचा खेळाडू दर्शीत अंकित जैन याला शाल, श्रीफळ व टोकन ऑफ लव्ह पुरस्कार हा कार्याक्रमाचे अध्यक्ष व खामगावचे आमदार मा. आकाश फुंडकर यांच्या हस्ते टोकन ऑफ लव्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. चिमुकल्या दर्शित ने त्याचा खेळ दर्षाऊन सर्व स्पर्धकांना, आलेल्या सर्व पालकांना व आयोजकांना प्रभावित केलं आणि हा पुरस्कार प्राप्त केला.

या स्पर्धेसाठी वय वर्ष ५ ते ८५ वर्षा पर्यंतचे खेळाडू होते या सर्व स्पर्धकांमध्ये स्पर्धेतील सर्वात लहान दर्षित जैन ने हा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकून त्याने चंद्रपूरचे नाव महाराष्ट्र मध्ये केले व सर्वांची मनं जिंकली. चंद्रपूर मधून सगळ्यात कमी वयात त्याने हा पुरस्कार बुद्धिबळात जिंकण्याचा मान जिंकला व येणाऱ्या दिवसामध्ये दर्षीत लवकरात लवकर बुद्धिबळ मध्ये त्याचे व चंद्रपूरचे नाव रोशन करेल अशी माहिती चंद्रपूर जिल्हा क्रियेटीव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मुसळे यांनी दिली.

स्पर्धेच्या आयोजनात मार्गदर्शन व आयोजक म्हणून अंकुश रक्ताडे (सहसचिव महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व सचिव, बुलडाणा जिल्हा चेस सर्कल) व प्रवीण ठाकरे (जळगाव मुख्य पंच) म्हणून जबाबदारी सांभाळून यशस्वीरित्या पार पाडली. क्रिएटिव चेस असोसिएशन चे अध्यक्ष अश्विन मुसळे, देवानंद साखरकर, जितेंद्र मशारकर, नरेंद्र लभाने, कार्तिक मुसळे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here