दिलीप वावरे यांच्यातर्फे अडचणीत असलेल्या गरजू लोकांना रुपये ५००० चे दैनंदिन गरजेच्या वस्तू वितरीत

0
480

दिलीप वावरे यांच्यातर्फे अडचणीत असलेल्या गरजू लोकांना रुपये ५००० चे दैनंदिन गरजेच्या वस्तू वितरीत

चंद्रपूर/प्रतिनिधी : दिलीप वावरे यांच्यातर्फे अडचणीत असलेल्या गरजू लोकांना रुपये ५००० चे दैनंदिन गरजेच्या वस्तू वितरीत करण्यात आल्या. धान्य किट वाटपाच्या माध्यमातून प्रबोधन करून मानसिक बळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धान्य किट साहित्यात तांदूळ, गहू, अंघोळीची साबण, कपड्यांची साबण, भांड्याची साबण, टूथपेस्ट, खाण्याचं तेल, केसांच तेल, तिखट, मीठ, हळद, बिस्किट, डाळ, साखर, पत्ती, नीरमा पाकीट ईतर वस्तू देण्यात आल्या. अशा एकूण दैनंदिन वस्तू वितरित करण्यात आल्या.
हे करत असताना फिजिकल डिस्टन्स ची पुरेपूर काळजी घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे ते अडचणीत आहे याची जाणीव ठेवूनच कुठल्याही प्रकारचे फोटोग्राफी न करता मान सन्मानाने चर्चा करून वन बाय वन धान्य किट देण्यात आले.
वस्तू मिळाल्यानंतर अडचणीत असलेल्या महिला अत्यंत आनंदी झाल्या. ज्या वस्तूची गरज होती त्याच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मिळाल्या असा भाव चेहऱ्यावर दिसत होता.
मा. वावरे सरांच्या सहकार्यामुळे काही महिलांना मोलाचे सहकार्य लाभले या सहृदय मदतीकरिता प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूरचे विनोद आर सोनटक्के यांनी सरांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here